(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News Live 23 September 2022 : वाजत गाजत या पण शिस्तीनं दसरा मेळाव्याला या - उद्धव ठाकरे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. आज शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा यावर निर्णय होणार आहे. तसेच आज पहिल्यांदाच नगर- आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे.
दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी, महापालिकेकडून दोन्ही गटांना परवानगी नाही
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा?, उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. तर पालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे.
आज पहिल्यांदाच नगर- आष्टी प्रवासी रेल्वे धावणार, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आज हिरवा झेंडा दाखवणार
बीड आणि नगरवासीयांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावणार आहे. याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत
पुण्यात पीएफआयचं आज आंदोलन
तपासयंत्रणांच्या तपासानंतर पुण्यात पीएफआयचं आज आंदोलन करणार आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पीएफआयनं आज केरळमध्ये संपाचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यातही आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचा दुसरा दिवस
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. निर्मला सीतारमण या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी20 सामने खेळवले जात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरा टी20 सामना महाराष्ट्रातील नागपूर शहरात खेळवला जाणार आहे.
ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघात, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. पुढे निघालेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. ट्रॅक्टर चालकाचे मात्र त्याकडे लक्ष नव्हते. अशातच ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे दुचाकीस्वार पत्नी अन लहान बाळ खाली कोसळले. तेंव्हाच ट्रॅक्टरचे मागचे चाक बाळाच्या डोक्यावरून गेले. ट्रॅक्टर चालक मात्र तसाच पुढं निघून गेला. मागे जखमी झालेल्या बाळाचा मृत्यू झाला होता.
दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे - उद्धव ठाकरे
दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवचा मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी. प्रत्येकवेळी वाईटाचा विचार करु नये. चांगली सुरुवात झाली आहे. विजया दशमीचा मेळावा... पहिला मेळावाही मला आठवतोय... आजोबांचं भाषण आजही माझ्याकडे आहे.. कोरोनाचा काळ गेला तर ही परंपरा कायम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष - उद्धव ठाकरे
इतर काय करतील, त्यांचा आपल्याला माहित नाही. पण आपली परंपरा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहोत. या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आणि जगात राहणाऱ्या बांधवांचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाकडेही त्यांचं लक्ष लागलं होतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उत्साहात या, वाजत गाजत या.. पण शिस्तीनं या... - उद्धव ठाकरे
वाजत गाजत गुलाल उधळत या - उद्धव ठाकरे
शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींनी उत्साहात दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर येण्याच आव्हान करतो. वाजत गाजत गुलाल उधळत या.. पण शिस्तीनं या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, तेज्याचा वारस्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका...
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
हायकोर्टानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये परवानगी दिल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.