एक्स्प्लोर

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी शिवडीच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांना खाष्ट सासूची उपमा दिली होती. त्यांना कंटाळून शिवसेनेतून सगळे बाहेर पडल्याचे राज यांनी म्हटले होते.

मुंबई: उद्धव ठाकरे हे एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे असल्यामुळे अनेकजण शिवसेना सोडून बाहेर पडले, असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर 'मातोश्री'च्या गोटातून पलटवार करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. तुमची बायकोही आता सासू आहे, तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? घरातच सुनेला जाच दिसतोय, अशी खोचक टिप्पणी किशोरी पेडणेकर यांनी केली. किशोरी पेडणेकरांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेचा किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलंत, तुमची पण बायको आता एक सासूच आहे. कुठूनही फिरुन एका स्त्रीचीच बदनामी करताय, तुम्ही बदनाम करणारे कोण? खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?, असा बोचरा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला.

अनुभव असल्याशिवाय कोणीही बोलत नाही. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली. त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे, तो अनुभव घेऊन तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाबद्दल बोलत असाल तर घरातूनच सुरुवात आहे, घरातच सुनेला जाच आहे. खाष्ट सासू म्हणून हिणवणं, हा स्त्रियांचाच अपमान आहे, ते पण वयस्क स्त्रियांचा अपमान आहेस, अशी खरमरीत टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली होती. त्यांनी म्हटले होते की, एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलतात. पण खरा गद्दार तर घरात बसलाय, तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिले राणे बाहेर पडले, त्यानंतर मी बाहेर पडलो, आता शिंदे... ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला, त्यांना उद्धव ठाकरेंनी घरी जेवायला बोलावलं. उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा

मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्या

Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget