Baramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहिती
Baramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहिती
हेही वाचा :
छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सदर व्हिडीओ समोर आणला आहे. पश्चिम मतदार संघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं आलं समोर आलं आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे. या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिली. अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय? अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडीओमध्ये पाच ते सहाजण दिसून येत आहे. यामध्ये देवळाई तांडा येथे माजी नगरसेवक असल्याचं देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुमची किती मते..8 मतं तर हे घ्या 4 हजार रुपये...असं संभाषण होताना दिसत आहे. तसेच सदर प्रकार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. पैसा वाटपाचा हा व्हिडीओ निवडणूक आयोगाला देखील देणार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.