एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 23 April 2022 : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 23 April 2022 : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

'मातोश्री' समोर राणा दाम्पत्यांचं हनुमान चालिसा पठण
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता ते मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे मातोश्रीजवळ शिवसैनिकांनी एकच गर्दी केली असून या परिसरात तणावग्रस्त वातावरण आहे. मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी वाढली आहे. 

राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, त्याच्या प्रतिक्रिया
भाजप नेते मोहित कंबोज 'मातोश्री' बाहेरुन जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मोहित कंबोज हे 'मातोश्री' बाहेर उभे राहून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या हल्ल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री साड नऊ वाजता मोहित कंबोज हे कलानगर परिसरातून जात होते. मोहित कंबोज यांची गाडी दिसल्यानंतर शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार असल्याची माहिती मोहित कंबोज यांनी दिली आहे. 

कोल्हापूरात राष्ट्रवादीचा मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. 

देशभरातील 1500 मौलवी आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला-
धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत असल्याने देशातील जवळपास 1500 मुस्लिम मौलवी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. तसेच पैगंबर बिल संदर्भात देखील चर्चा करणार आहेत.
स्थळ - अजमेरी मस्जिद हॉल, अनीस कंपाउंड, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, साकीनाका,
वेळ - रात्री 10 वाजता

अमित शाह यांचा बिहार दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार नसल्याने त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जातीय जनगणना तसेच विशेष राज्याचा दर्जा आणि इतर काही मुद्द्यांवरुन भाजप आणि नितीश कुमार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येतंय. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सार्वजनिक बँकांसोबत बैठक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या वर्षीचा अर्थसंकल्प मांडल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. 

आज दोन सामने
आजचा पहिला सामना गुजरात-कोलकाता दुपारी साडे तीन वाजता, तर दुसरा बंगळुरु-हैदराबादमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता आहे. 

17:11 PM (IST)  •  24 Apr 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नाहित : सूत्र

लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहित अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

17:05 PM (IST)  •  24 Apr 2022

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप 

लातूर येथील उदगीर येथे गेल्या तीन दिवसांपासून सूरू असलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. 

16:52 PM (IST)  •  24 Apr 2022

घाटकोपर मध्ये मनसेला गुजराती समाजाकडून गुजराती भाषेत फ्लेक्स लावून समर्थन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. याबरोबर मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावरून देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे मनसेला आता मराठी बरोबरच इतर भाषिकांचेही समर्थन मिळताना दिसत आहे. घाटकोपर मधील गुजराती समाजातील तरुणांनी ही मनसेच्या या भूमिकेच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. घाटकोपर येथील असल्फा मेट्रो स्थानकाजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत.

16:02 PM (IST)  •  24 Apr 2022

राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल : जयंत पाटील 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली जात आहे. परंतु, राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहेत. 

23:29 PM (IST)  •  23 Apr 2022

Amravati News Update : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार

Amravati News Update : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार झाला आहे. योगेश घारड हे आपल्या चारचाकी वाहनातून उतरून घरी जाताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी त्यांच्या मांडीला लागली असल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Embed widget