Maharashtra Breaking News 23 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सुनवणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने निव्वळ आपल्या राजकीय फायद्यासाठी बेकायदेशीररित्या आपल्या शेवटच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा प्रश्न घाईघाईत मार्गी लावला होता. त्यानंतर 16 जुलै रोजी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं याला स्थगिती देत काही तासांतच औरंगाबादचं नाव पुन्हा बदलून संभाजीनगर करत असल्याचं जाहीर केलं. या सर्वबाबींकडे या याचिकेतून न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे.
खासदार भावना गवळी यांचं वाशिममध्ये मोठं शक्तीप्रदर्शन
खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. वाशिमच्या वाटणे लॉन इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार. भाजप आणि शिंदे गटाचे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित राहणार आहेत.
राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आज मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. आज राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले.
आज इतिहासात
1892 : ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन
1918 : श्रेष्ठ कवी, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर यांचा जन्म
1944 : चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म
1971 : मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर यांचे निधन
1971 : मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन
1974 : मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन
Soniya Gandhi : सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार
Soniya Gandhi : सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. राहुल आणि प्रियांका गांधी वाड्रा देखील सोबत जाणार आहेत. राहुल गांधी 4 सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेसची महागाई रॅली संबोधित करणार आहे. 7 सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा आहे.
बीड जिल्ह्यातल्या एकुरका गावात विहिरीत बुडून बापलेकाचा मृत्यू
बीडच्या केज तालुक्यातील एकुरका गावामध्ये विहिरीत बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 13 वर्षाचा रोहन नटराज धस हा सायंकाळच्या वेळी विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता तो पाय घसरून विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत असताना त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे वडील नटराज धस यांनी देखील विहिरीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने या दोघा बापलेकांचा बुडून मृत्यू झाला.
MP Flood : एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टरद्वारे 25 जणांना सुरक्षितस्थळी हलविले
नागपूरः मध्य प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीला मंगळवारी सकाळी नागपुरातून दोन एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मंगळवारी रात्रीपर्यंत 25 जणांचा रेस्क्यू करण्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ऑपरेशन्समध्ये विंचिंग आणि लो होवर ऑपरेशन दोन्ही समाविष्ट होते. सध्या हे हेलिकॉप्टर मध्य प्रदेश येथील विदीशा येथे बचाव कार्यासाठी तैनात आहेत.
MP Flood : एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टरद्वारे 25 जणांना सुरक्षितस्थळी हलविले
नागपूरः मध्य प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीला मंगळवारी सकाळी नागपुरातून दोन एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मंगळवारी रात्रीपर्यंत 25 जणांचा रेस्क्यू करण्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ऑपरेशन्समध्ये विंचिंग आणि लो होवर ऑपरेशन दोन्ही समाविष्ट होते. सध्या हे हेलिकॉप्टर मध्य प्रधेश येथील विदीशा येथे बचाव कार्यासाठी तैनात आहेत.
Dombivali : डोंबिवली पश्चिम गायकवाडवाडी परिसरातील घटना, पारसनाथ इमारतीमध्ये एका तळमजल्यावरील घरात स्फोट
Dombivali : डोंबिवली पश्चिम गायकवाड वाडी परिसरातील पारसनाथ इमारतीमध्ये एका तळमजल्यावरील घरात स्फोट झाला आहे. या स्फोटात महिलेसह तीन जण जखमी आणि आठ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. मनीषा मोरवेकर, उर्सुला लोढाया, चार वर्षाचा मुलगा रियांश, मनीषा मोर्वेकर यांच्या घरात स्फोट झाला आहे. उर्सुला लोधाया व तिचा चार वर्षाचा मुलगा पहिल्या माळ्यावर जात असताना अचानक झालेल्या स्फोटात जखमी झाले