(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 21 April 2022 : गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचा-यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणात एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्याचं न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी निश्चित केलं आहे. तसेच याच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावरही गुरूवारी एकत्रित सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. या सर्वांच्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी बुधवारी राज्य सरकारनं कोर्टाकडे वेळ मागून घेतला.
काँग्रेस प्रभारी एच. के पाटील यांचा आज मुंबई दौरा
सह्याद्रीवर झालेल्या कॉग्रेस मंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीनंतर आता महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी एच. के पाटील आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा मुंबई दौरा येत्या 28 एप्रिलला नियोजित आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी महाराष्ट्रातील कॉग्रेस नेते आणि मंत्र्यांची भेट घेतील. 22 एप्रिलला एच के पाटील मुंबईत येत आहेत. यावेळी दिल्लीत हायकमांडकडे कॉग्रेस आमदारांची नाराजी, अंतर्गत ताळमेळ, जिल्हास्तरीय जनता दरबार, कॉग्रेस मंत्र्यांची कॅबिनेटमधील आक्रमक भूमिका याविषयांवर खल होण्याची शक्यता आहे. तसंच राहुल गांधांच्या मुंबई दौऱ्यात राहुल गांधी कोणा कोणाला भेटणार याचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
जहांगीरपुरी येथे एमसीडीच्या अतिक्रमणविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
दिल्ली पालिकेच्या तोडक कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर बुल्डोझर चालवला जात आहे. जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने तूर्तास स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर आज (गुरुवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे.
दिल्ली हिंसाचाराच्या आरोपींचे बंगाल कनेक्शन
दिल्ली हिंसाचारातील आरोपींच्या बंगाल कनेक्शनसाठी पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात दिल्ली पोलिसांच्या पथकाची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचे तीन सदस्यीय पथक ही चौकशी करत असून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा बांगलादेशाशी संबंध आहे की, ते बंगालचे रहिवासी आहेत, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली जात असून कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाईल.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज गुजरातमधून दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. आज गुजरातमध्ये येणारे ब्रिटीश पंतप्रधान गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंधांवर अनेक उद्योगपतींना भेटणार आहेत. जॉन्सन 22 एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या गुजरात-दिल्ली भेटीला ब्रिटनच्या नव्या इंडो-पॅसिफिक धोरणाशीही जोडले जात आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या निम्म्याहून अधिक इंडो-ब्रिटिश नागरिक गुजराती वंशाचे आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सालेमने दावा केला आहे की, पोर्तुगालमधून त्याच्या प्रत्यार्पणात नमूद केलेल्या अटींनुसार भारतातील तुरुंगवास 2027 पेक्षा जास्त असू शकत नाही. या प्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने उत्तर दाखल करताना केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाने सालेमच्या सुटकेवर सुनावणी करू नये, असे म्हटले आहे. भल्ला यांनी असेही म्हटले आहे की, त्याच्या सुटकेचा विचार करण्याची वेळ 2030 मध्ये येईल. मग काय करायचे ते सरकार ठरवेल. सकाळी 11.40 वाजता सुनावणी होणार आहे.
'ह्युमन कॉम्प्युटर' शकुंतला देवी यांची पुण्यतिथी
'ह्युमन कॉम्प्युटर' असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांची आज पुण्यतिथी आहे. शकुंतला देवींचा जन्म 1929 मध्ये बंगळूरूमध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1982 साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.
हरलं तर थेट बाहेर... चेन्नई-मुंबई विजयासाठी मैदानात उतरणार
आयपीएल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईचा गुरुवारी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईपुढे तगड्या चेन्नईचं आव्हान असेल. मुंबई आणि चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाची यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबईला पहिल्या सहाही लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सहा सामन्यात चेन्नईचे पाच पराभव झाले आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेंकासमोर उभे राहतील.
आज इतिहासात
1526: मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यातील पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहिम लोदी मारला गेला आणि भारतात मुघल राजवटीचा पाया घातला गेला.
1926: इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक काळ राज्य करण्याचा विक्रम केला आहे.
1938: सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...चे गीतकार प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांचे पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले.
1996: भारतीय हवाई दलाचे अधिकारी संजय थापर यांना पॅराशूटमधून उत्तर ध्रुवावर उतरवण्यात आले.
अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला एनसीबीने घेतलं ताब्यात
अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिचा भाऊ अॅगिसियालोस डेमेट्रिएड्स याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. एनसीबीने बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ अगिसिलाओस डेमेट्रिएड्स विरुद्ध PITNDPS (अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांमधील अवैध वाहतूक प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आगिसिलाओस डेमेट्रिएड्स या दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे
मिटकरी यांच्या बद्दल बोलण म्हणजे आम्हाला लाजल्या सारख होतं, मूर्खाबद्दल काय बोलणार - राजू पाटील
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या पाठोपाठ सांगली येथे झालेल्या सभेत त्यांनी ब्राह्मण समाजावर टीका केल्याचा आरोप होतोय .याबाबत मनसे आमदार राजू पाटील मिटकरी यांच्या बद्दल बोलण म्हणजे आम्हाला लाजल्या सारख होतं, मूर्खाबद्दल काय बोलणार? असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरिना लगावला .आमदार राजू पाटील आज कल्याण ग्रामीण भागात सुरू झालेले लोडशेडिंग,वीज बिल सोबत आलेली डिपॉझिटची बिले आदी समस्यांबाबत महावीतरन अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर शहरात देखील एक दिवस एक प्रभाग अशी योजना सुरू करा जेणे करून नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील अशी मागणी केली .
13 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू; दोन कुटुंबाच्या संसारोपयोगी साहित्याचीही राखरांगोळी
Wardha: सेलू तालुक्यात शेतातील गोठ्याला शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 13 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी स्टेशन येथे घडली. या दुर्घटनेत शेती साहित्यासह तेथे वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबाच्या संसारोपयोगी साहित्याचीही राखरांगोळी झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची दुर्दैवी वेळ आली.
Gadchiroli : चार जहाल नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई
नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले आहे. एकुण 18 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षल्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन एसीएम आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात पोलिसांनी धडक कारवाई केली. नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं
1) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे, वय 30 वर्षे, रा. नेलगुंडा, ता. भामरागड
२) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे, वय 34 वर्षे, रा. कनेली, ता. धानोरा
३) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी, वय 24 वर्षे, पडतमपल्ली, ता. भामरागड
४) अजित ऊर्फ भरत, रा. झारेवाडा, ता.एटापल्ली, जि. गडचिरोली
ST Protest : गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचा-यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
ST Protest : गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचा-यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी होणार सुनावणी आहे. गुरूवारी वेळेअभावी सुनावणी झाली नाही