Maharashtra Breaking News 16 May 2022 : बालगंधर्व नाट्यगृहात राडा, राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
राज ठाकरेंच्या हिंदू कार्डनंतर, देवेंद्र फडणवीसांचा 'जागो हिंदुचा नारा'
लंका का दहन होगा, सब वानरसेना मेरी साथ तयार आहे. बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकणार तुम्ही तयार व्हा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या उत्तरसभेत ते असे म्हणाले आहेत. बीकेसी येथील सभेत बाबरी मशिदीवरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ''अयोध्याच्या आंदोलनात तुमचा (उद्धव ठाकरे यांना उद्देशून) एकही नेता नव्हता, हे म्हंटल्यावर राग आला.'' अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील गाण्याच्या अंदाजात उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावत ते म्हणाले, ''मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो मस्जिद गिरा रहा था, तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू.'' ते म्हणाले, ''हो मी गेलो होतो बाबरी पाडायला, याचा मला अभिमान आहे. 1992 साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये मी अयोध्येला मशीद पाडायला गेलो होतो. तुम्ही गेले होते, सहलीला. आम्ही नाही.'' यावेळी त्यांनी जागो हिंदुचा नारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन काय?
बीकेसीतल्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. या सभा सर्व विभागवार घेणार असल्याची माहिती आहे. या सभा कुठे आणि कुठल्या मुद्द्यांवर होणार. या सभांचा फायदा सेनेला किती होणार? हे पाहावं लागेल.
आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद
नारायण राणे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार? केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी एकमेकांशी भिडणार पंजाब-दिल्लीचा संघ
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 64 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. प्लऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघानं 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं दिल्लीच्या संघानंही 12 सामने खेळून सहा सामने जिंकले आहेत. तर, सहा सामन्यात पराभव पत्कारला आहे.
Pune : स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून कृत्य
पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीच्या ताफ्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागातील कार्यकर्त्यांनी अंडी फेकण्याचा प्रयत्न केला आहे.
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून निषेध
पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Smriti Irani : काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणींचा ताफा अडवण्याच प्रयत्न
स्मृती इराणी बालगंधर्वमध्ये येत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Ajit Pawar : राज्य सरकार केंद्रीय मंत्र्यांना सुरक्षा देणार : अजित पवार
आंदोलन अहिंसेच्या मार्गाने असावे, आंदोलनात मर्यादा रहावी, शारीरिक हिंसा नसावी, केंद्रीय मंत्र्यांना सुरक्षा देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्रीय मंत्र्यांना सुरक्षा देणार, असे मत उमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
Raigad : खोपोली नगरपरिषदेच्या मुख्य पाण्याच्या लाईनमधून हजारो लिटर पाणी वाया
Raigad : खोपोली नगरपरिषदेच्या मुख्य पाण्याच्या लाईनमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. खोपोलीजवळील विहारी पुलावरून जाणाऱ्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती झाल्याने पाणी वाया जात आहे.