Maharashtra Breaking News : किल्ले सिंहगडावर शेकडो पर्यटक अडकून, बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा शपथविधी
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर माणिक साहा यांची वर्णी लागलीय. बिप्लब देव यांनी आज त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रतिमा भौमिक, माणिक साहा आणि जिष्णू देव वर्मा यांची नावं आघाडीवर होती..अखेर माणिक साहा यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर माणिक साहा उद्या सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
देवेंद्र फडणवीसांची सभा
शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा होतं आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. उद्या ( 15 मे) भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
गुजरातमध्ये आम आदमीची परिवर्तन सभा
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची परिवर्तन सभा होणार आहे. 182 विधानसभा मतदार संघात 20 दिवस ही सभा सुरू राहणार आहे
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पदभार स्वीकारणार
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे आज (15 मे) रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहे
फास्टफूडमधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्डची सुरूवात
फास्टफूडमध्ये लोकप्रीय ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्ड या फूड जॉईंटचे देखील कोट्यवधी ग्राहक चाहते आहेत. मॅकडॉन्लडची सुरूवात 15 मे ला झाली होती. रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉन्लड या दोन भावंडानी कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डीनो येथे 15 मे 1940 सुरूवात केली. आज 100 पेक्षा अधिक देशात 35,000 पेक्षा जास्त आउटलेट आहे.
आयपीएलमध्ये आज डबल डोस
आज आयपीएलच्या मैदानात डबल धमाका आहे. दुपारी चेन्नई आणि गुजरातचा संघ समोरा समोर येणार आहे.. तर संध्याकाळी साडेसात वाजता लखनौ आणि राजस्थान यांच्यातील सामना होणार आहे. राहुल आणि संजू यांच्यात ब्रेबॉनच्या मैदानावर लढत होणार आहे. तर धोनी आणि हार्दिक यांची लढत वानखेडेच्या मैदानावर असेल.
आज इतिहासात
1817 - देवेंद्र नाथ टागोर यांचा जन्म
1923 - भारतीय विनोदी अभिनेता जॉनी वॉकरचा जन्म
1967 - बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा जन्म
1993 - देशाचे पहिले आर्मी कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन
1995 - एलीसन गारग्रीब्स एव्हरेस्टवर विना ऑक्सिजन जाणारी पहिली महिला
solapur news update : शरद पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचे पद स्थगित
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचे पद स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पद स्थगित केल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी पत्रद्वारे दिली आहे. पवार विरोधी बोलणाऱ्यांना 'शोधा आणि तोडा' मोहीम करा असे जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना कदम यांनी पत्र दिले होते. कदम यांची ही भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणा विरोधात असल्याचे मत व्यक्त करत खुलासा येईपर्यत सुहास कदम यांचे पद स्थगित करण्यात येत असल्याचे गव्हाणे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पद स्थगित
शरद पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचे पद स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पद स्थगित करण्यात आले आहे.
किल्ले सिंहगडावर शेकडो पर्यटक अडकून, बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप
किल्ले सिंहगडावर शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. गडावरुन खाली जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रविवार असल्याने पर्यटकांची आज मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. अपुरी बस संख्या आणि त्यातच चार्जिंग संपल्याने हजारो पर्यटक अजूनही गडावर आहे. वन विभाग आणि पीएमपी विभागाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळणार आहे. चार्जिंग स्टेशन्स कमी असल्याने बसेस चार्ज होण्यासाठी मोठा कालावधी लागतोय. आज दुपारी सिंहगडावर गेलेले पर्यटक अद्यापही गडावरच आहे.
Dharmaveer : प्रत्येक शहरात एक आनंद दिघे हवेत, धर्मवीर चित्रपटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''धर्मवीर चित्रपटात प्रसाद ओक यांची भूमिका अप्रतिम आहे. प्रत्येक शहरात एक आनंद दिघे हवेत, हे वाक्य खूप आवडलं.'' उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचं नातं घट्ट होतं, असं म्हणत त्यांनी सर्वानी चित्रपट नक्की पाहा असं आवाहन केलं आहे.
Sharad Pawar : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी शरद पवार वर्षा निवास्थानी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वर्षा निवास्थानी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यसभा निवडणुकी संदर्भात चर्चा होत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.