Ajit Pawar : अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
Ajit Pawar visit Vidarbha Marathwada : आपल्या दौऱ्यात अजित पवार (Ajit Pawar) स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत.
Ajit Pawar visit Vidarbha Marathwada : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे 28 जुलै म्हणजेच गुरुवारपासून विदर्भ(Vidarbha) , मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती मिळत आहे, आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत.
'या' भागाला भेट देणार
अजित पवार हे गुरुवारी, 28 जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, 29 जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, 30 जुलैला विरोधी पक्षनेते हे नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून 110 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसंच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन त्वरीत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.