Jalgaon : जळगावच्या सुवर्ण नगरीत पाडव्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी गर्दी, दागिन्यांच्या पारंपरिकसह विदेशी डिझाईनलाही मोठी मागणी
जळगावच्या सुवर्ण नगरीत (jalgaon) गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) मुहूर्तावर सोने खरेदीसाठी विदेशी प्रकारातील दागिन्यांच्या डिझाईन्स सुद्धा सोने व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याचं पाहायला मिळत आहे.
![Jalgaon : जळगावच्या सुवर्ण नगरीत पाडव्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी गर्दी, दागिन्यांच्या पारंपरिकसह विदेशी डिझाईनलाही मोठी मागणी maharashtra marathi Jalgaon news rush to buy gold at time of Gudhi Padwa 2022 demand for traditional and foreign designs of Jewelery Jalgaon : जळगावच्या सुवर्ण नगरीत पाडव्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी गर्दी, दागिन्यांच्या पारंपरिकसह विदेशी डिझाईनलाही मोठी मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/6cf447e51d6e9429422290ce99cf2a09_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalgaon Gold News : गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) निमित्ताने जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने खरेदीसाठी मोठा मुहूर्त मानला जातो. यावेळी पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईन्सला मोठी मागणी मिळत होती, यंदा मात्र यात मोठा बदल झाला असल्याचं दिसून येतं आहे. पाश्चात्य पद्धतीच्या दागिन्यांना आता मोठी बाजारपेठ निर्माण झाल्याने अनेक सोने व्यापाऱ्यांनी पाडव्यासाठी विदेशी दागिने विक्रीसाठी सज्ज करून ठेवले आहेत.
पाडव्यासाठी विदेशी दागिने विक्रीसाठी सज्ज
गुढी पाडव्याचा मुहूर्त हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त मानला जातो. या निमित्ताने अनेक जण शुभ कार्य करीत हा मुहूर्त साजरा करत असतात. शुभ मुहूर्ताला केलेली सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याची अनेक जणांची श्रद्धा असल्याने अनेक जण या मुहूर्तावर सोने खरेदी करीत असतात.पाडवा हा सोने खरेदीचा शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक ग्राहक पारंपरिक पद्धतीच्या डिझाईन्सचे दागिने खरेदी करीत असल्याचं नेहमीच पाहायला मिळत असते, मात्र बदलत्या काळात अनेक तरुण आणि तरुणी विदेशात नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने जात असल्याने त्यांच्या आवडी निवडीचाही मोठा प्रभाव होत असल्याच दिसून आले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्ण नगरीत आता भारतीय डिझाईन सोबत पाश्च्यात्य संसृतीचा ही मोठा प्रभाव होत असल्याच दिसून येत आहे.
आखाती देशात वापरल्या जाणाऱ्या डिझाईन्सची मागणी
जळगावच्या सुवर्ण नगरीत आता कुवेती, कोरियन, पेशवाई, सिंगापूर,आणि आखाती देशात वापरल्या जाणाऱ्या डिझाईन्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशातच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या दागिन्यांना असलेली मागणी पाहता या प्रकारातील दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन आपल्या दुकानात ठेवल्या आहेत. पाडव्याचा हा मुहूर्त साधण्यासाठी नव्या प्रकारात असलेले दागिने आपल्या दुकानांसाठी सज्ज करून ठेवले आहे
आवडीच्या डिझाईनचेच दागिने खरेदी
पाश्चात्य देशात राहणाऱ्या आपल्या भावासाठी जळगाव शहरात राहणाऱ्या वैशाली पाटील या आज सोन्याच्या दुकानात विदेशी पद्धतीचे दागिने डिझाईन पाहण्यासाठी आल्या होत्या, इतरांच्या पेक्षा वेगळ्या डिझाईनचे दागिने आपल्याकडे असावे यासाठी त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या भावानं त्यांना त्यांच्या आवडीच्या डिझाईनचेच दागिने खरेदी करण्यासाठी सांगितलं आहे. भावाच्या मागणीनुसार त्यांनी विदेशात जास्त प्रकारात चालणाऱ्या डिझाईनची दागिने बुकिंग आज जळगावमध्ये केली असून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्या ते दागिने खरेदी करणार आहेत.
संबंधित बातम्या
Gold Price in India : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपल्यास सोन्याच्या किंमती घसरणार? वाचा संपूर्ण माहिती
'बाप्पी दा' यांच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय; पाहा फोटो!
भंगाराला सोन्याचं मोल! 20 दिवसातच प्रतिक्विंटल तीन हजारांची वाढ : Special Report
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)