एक्स्प्लोर

Gondia News : गोंदियात "भगत की कोठी" ट्रेनला अपघात, एक डब्बा रुळाखाली घसरला, 50 हून अधिक जखमी

Gondia Train Accident News : अपघातात जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Gondia Train Accident News : रायपुरकडून नागपुरच्या दिशेने  जाणाऱ्या "भगत की कोठी" (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात (Train Accident) झाल्याची घटना घडली. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला 'भगत की कोठी ट्रेन'ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे.  या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. सुत्रांच्या माहितीनुसार या ट्रेनच्या अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही घटना आज पहाटे 4 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे.

सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने अपघात?

मालगाडीला 'भगत की कोठी' ट्रेन ने दिली मागून धड़क दिली, तेव्हा ट्रेनचा एक S3 डब्बा रुळाखाली घसरला. अपघातात 53 च्या वर लोक  जखमी तर 13 किरकोळ जखमी झाले आहे. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या, 'भगत की कोठी' ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती, मात्र याच रुळावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती आहे.

13 गंभीर जखमी

या ट्रेनमधील 13 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, या भीषण अपघातात एकही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, पहाटे 4.30 वाजता री-रेल्मेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर, ही ट्रेन सकाळी 5.24 वाजता घटनास्थळावरून निघाली आणि 5.44 वाजता गोंदियाला पोहोचली. त्याचवेळी सकाळी 5.45 वाजता अप आणि डाऊन वाहतूक पूर्ववत झाली.

अपघात कसा घडला? रेल्वे विभागाकडून चौकशी

गोंदियात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या रेल्वे अपघाताची पाहणी गोंदिया रेल्वे अपघाताची DRM मणिदर सिंग उत्पल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया शहराला लागुन असलेल्या चुलोद गावाजवळ रायपुरच्या दिशेने येणाऱ्या भगत की कोटी या ट्रेन ने एकाच रेल्वे रुळावर समोर चालत असलेल्या माहालगाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला सिंग्नल प्रणालीच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या रेल्वे अपघात कुणीही दगावले नसले तरी एकाच रुळावर दोन रेल्वे गाड्या एक दुसऱ्याला आदळल्या. रेल्वे विभाग याचा शोध घेत आहे. या घटनेची पाहणी स्वत: डिआर एम मणिदर सिंग उत्पल यांनी केली असल्याने अपघाताची तीव्रता काय होती हे लक्षात येते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget