Lok Sabha Election 2024 : पूर्व विदर्भात दिग्गज नेत्यांची मांदियाळी; आज जे. पी. नड्डा, तर उद्या राहुल गांधीची जाहीर सभा
Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून सुरुवात होणार असून त्याकरिता जवळवळ सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घातली आहे.
Maharashtra Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून (Vidarbha) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भात जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून पक्षातील दिग्गजांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घातली आहे. अलिकडेच चंद्रपूर (Chandrapur) आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या (PM Modi In Maharashtra) दोन भव्य सभा पार पडल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) हे देखील आज विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडारा येथे आयोजित भव्य जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत. तर त्या पाठोपाठ उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील विदर्भाच्या दोऱ्यावर असणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्याच्या साकोली इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहे. त्यामुळे विदर्भात सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी सध्या बघायला मिळत आहे.
भापचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा विदर्भ दौऱ्यावर
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा नारळ हा पूर्व विदर्भापासून फुटणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात येत्या 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षानी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत मतदारांपर्यंत पोहचण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यात तळागाळातील कार्यकर्त्यांसह पक्षातील दिग्गजही प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. अशातच आज, 12 एप्रिलला भापचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दरम्यान ते भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ शहरातील सर्कस ग्राऊंडवर आयोजित भव्य जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार, आमदार आणि महायुतीतील पदाधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या सभास्थळी भजापच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून या सभास्थळावरून जे. पी. नड्डा नेमका कोणावर निशाण साधतील या कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधीची पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात सभा
भाजप पाठोपाठ काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनीही आपला प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. अशातच उद्या 13 एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्याच्या साकोली इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघातील साकोली येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या भव्य मैदानात ही सभा होत आहे. या सभेला भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली येथील उमेदवारांसाठी ही सभा होत आहे. राहुल गांधी यांची पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात सभा होत असल्यानं या सभेला लाखोंच्या संख्येनं महाविकास आघाडीचे समर्थक साकोली पोहचतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काँग्रेसने आपली संपूर्ण ताकद लावत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या