Lockdown Live Update | सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमामुळे गावावर विघ्न, छोट्याशा गावात 155 कोरोनाबाधित
Maharashtra Lockdown LIVE Updates: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कोणत्या भागात, शहरात काय काय निर्बंध घालण्यात आले आहेत, याबाबत प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केल. तसेच सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
पुणे
पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे. विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत मर्यादित.
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक
नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
Corona Virus: शक्य असेल तिथं 'वर्क फ्रॉम होम' सुरु ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही
नागपूर
आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद तर मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद राहणार. 7 मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील. मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी नंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल. मंगल कार्यालयमध्ये 7 मार्चपर्यंत लग्न होणार नाही. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार आहेत.
नांदेड
शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर आणि योग्य अंतर या त्रिसूत्री नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
अमरावती विभाग
अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील. लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील. सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
अमरावती- जिल्ह्यातील अमरावती आणि अचलपूर/परतवाडा शहरात आजपासून रात्री 8 वाजल्यापासून आठवडाभर लॉकडाऊन
अकोला- अकोला महापालिका क्षेत्र, अकोट आणि मुर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात २३ फेब्रुवारीपासून आठवडाभर लॉकडाऊन
बुलडाणा- आजपासून पुढील आदेशापर्यंत शेगाव गजानन महाराजांचं मंदिर बंद
पंढरपूर-विठ्ठल मंदिर बुधवार सकाळपर्यंत बंद, शहरातही संचारबंदी लागू
औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपासून शहरात चालणारे रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी पाहायला मिळतात. त्याच बरोबर रिक्षाचालक देखील मास्क वापरत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी आता विनामास्क रिक्षाचालकांना चालवणार्या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. एकापेक्षा अधिक वेळा एखाद्या रिक्षाला दंड झाला तर ती रिक्षा जप्त करणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.