Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai Airport) आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत 2 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर रवाना
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत 2 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर रवाना
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4 वाजता उदय सामंत म्युनीच ला होणार दाखल
म्युनीच वरून उदय सामंत स्ट्युटगार्ड मुक्कामी पोहचणार
दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत ना. उदय सामंत उद्योग विभागाच्या विविध बैठकांना राहणार उपस्थित
दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता ना. उदय सामंत महाराष्ट्र मंडळ बैठकीला करणार मार्गदर्शन
दि. 10 ऑक्टोबर रोजी उदय सामंत मायदेशी परतणार
उदय सामंत ह्यांच्या सोबत उद्योग विभाग सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. वेलरासू, विकास आयुक्त श्री. दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित
माढ्याच्या पिंपळनेरमधील गणेश विद्यालय बाॅम्बने उडवण्याची खोडसाळ धमकी; कुर्डूवाडी पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल
माढ्याच्या पिंपळनेर मधील गणेश विद्यालय बाॅम्बने उडवण्याची खोडसाळ धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. यामुळे शाळा व पालकात घबराट निर्माण झाल्यावर शाळेच्या मुख्यध्यापकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यानुसार कुर्डूवाडी पोलिसांत ( ncr)प्रमाणे अज्ञातावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ज्यांच्या नावाने पत्र शाळेला पाठवण्यात आले आहे.त्या व्यक्तिची मुलगी त्या शाळेत शिकत असून पोलिसांत जाऊन त्याने मी पत्र दिले नसून या पत्राचा माझा संबध नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे शाळेला खोडसाळ धमकीचे पत्र देऊन भितीचे वातावरण निर्माण करणार्या त्या व्यक्तिचा शोध कुर्डूवाडी पोलिस करीत आहेत.























