Maharashtra Live Updates: सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडले भुयार
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर आरएसएस हेडक्वार्टर उध्वस्त करा, अंधारेंचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जर हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला, त्या विचारांवर चालणारे आरएसएस हेडक्वार्टर उध्वस्त करा, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. सगळे खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले लोक दीक्षाभूमीवर ओळीने उभे करा आणि मग त्यांच्या तोंडून बाबासाहेब ऐकायला लोक तयार होतील असे अंधारे म्हणाल्या. खबरदार, तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापराल तर याद राखा असा इशारा देखील अंधारे यांनी दिला.
आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नाही : अजित पवार
आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. याबद्दल आम्हाला नोटीस काढावी लागेल, असं मी काल सांगितलं होतं. त्या पद्धतीने नोटीस काढली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागला तर कोणताही पक्ष सहन करणार नाही असे अजित पवार म्हणाले.
























