Maharashtra Live Update : लोकसभा निवडणुकीच्या आज सहाव्या टप्प्याचं मतदान, राज्यातील तसेच देशातील बातम्यांचा वेगवान आढावा वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या...
Yavatmal News : उष्णतेचा पारा 44.5 अंशावर, मागील पाच वर्षांतील उच्चांक
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात पारा 44.5 अंशावर पोहोचला आहे त्यामुळे आता नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. गेल्या आठ दिवसानंतर हवामानात बदल झाल्यानंतर उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने आज पारा 44.5 डिग्रीवर पोहोचला असल्याने नागरिकांना बाहेर पडताना टोपी आणि शेल्याचा वापर करावा लागत आहे. उन्हाची लाई होत असताना आता ज्यूस आणि रसवंतीवर गर्दी होताना दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. अवकाळी वादळी पावसानंतर जिल्ह्यात एकदमच उष्णतेची लाट वाढली आहे. मागील पाच वर्षातील उष्णेतेने उच्चांक गाठला आहे.
Gadchiroli News : अहेरी-अमरावतीत बसचा अपघात; वाहकासह दोन महिला गंभीर जखमी
Gadchiroli News : अहेरी-अमरावती बसचा अपघात.. वाहकासह दोन महिला गंभीर जखमी आलपल्ली-आष्टी मार्गावरील धंनूर फाट्यावरील घटना घडली आहे.. अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच-07 सी 9463 ही अहेरी वरून 27 प्रवासी घेऊन अमरावतीच्या दिशेने ही बस जात होती. धंनूर फाट्यावरील वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून येत असलेल्या वाहनाला साईड देण्याच्या दरम्यान बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली. जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या बसमध्ये वाचकाची मुलगी देखील प्रवास करत होती. तिलाही दुखापत झाली आहे. घटनास्थळी अहेरी आगारचे पथक दाखल झाले आहे.


















