Maharashtra Live Blog Updates: बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, पंडित-हाके समर्थक आमनेसामने
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (25 ऑगस्ट) अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद आहे. आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
नाशिकमध्ये शरद पवार गटाचे राज्यव्यापी शिबिर होणार
नाशिक : १४ आणि १५ सप्टेंबरला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन, तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामधून "ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या" अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
जळगाव शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, नागरिकांची तारांबळ
जळगाव : शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जळगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत हरतालिका व गणेशोत्सवाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची तसेच व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली आहे. जळगाव शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली असून हरतालिका गणेश चतुर्थी यासह गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.























