Maharashtra Live Blog Updates: कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला
Maharashtra Live Blog Updates: 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: शक्तीपीठ महामार्गविरोधात आंदोलन केल्याने राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पाच तारखेच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते वरळी डोमची पाहणी करणार आहेत. 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची गर्दी
नाशिक : पावसाळा सुरू होताच नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीये. मागील आठवड्यात १६ रुग्ण आढळले, तर आतापर्यंत १३७ रुग्णांची नोंद झालेली आहे. आणि सध्या २५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट आहे. मागील वर्षी जूनमध्ये १६५ रुग्णांवर उपचार सुरू होते. महापालिकेच्या आरोग्य विभागानं विशेष उपाययोजना सुरू केल्या असून, झोपडपट्टी, नाले व जलसाठ्यांची तपासणी सुरू आहे. डेंग्यूचा प्रसार मुख्यतः Aedes नावाच्या मच्छरांमुळे होतो. हे मच्छर सकाळी आणि संध्याकाळी चावतात आणि घरातल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. डेंग्यूची मुख्य लक्षणं म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, उलटी आणि त्वचेवर लाल चट्टे. लक्षणं दिसताच तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलाय. तर महापालिकेने फॉगिंग, औषध फवारणी आणि जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत. तरीसुद्धा नागरिकांनी घरात पाणी साचू देऊ नये, डेंग्यूचा ताप ओसरल्यावरही रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे रक्ताच्या तपासण्या आवश्यक असल्याचेही पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी आवाहन केलंय.
Karad Sahyadri Hospital Fire : कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला
साताऱ्यातील कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. यावेळी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर 43 रुग्ण उपचार घेत होते. अचानक आग लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली. पण वेळीच सर्व रुग्णांना सुरक्षितस्थळी नेण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटने गॅसच्या पाईपला आग लागल्याची समोर आले आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये धुराचे लोट पसरले होते. आगीमुळे आणि धुरामुळे रुग्णांमध्ये आणि नातेवाईकांच्या भीतीचे वातावरण पाहायला मिळालं. पेशंट भीतीने पळापळी करत होते. हॉस्पिटल सुरक्षेच्या बाबतीत कमी पडल्याची तक्रार करत रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
























