नवाब मलिक, नितेश राणेंच ट्विट वादात,महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर
राजकीय संघर्ष आता एकमेकांवरचा राग किंवा एकमेकांविषयीच्या मत्सराकडे झुकू लागल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागलंय का, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.

मुंबई : विधानभवनाची हास्यजत्रा केल्यानंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना अतिशय खालची पातळी गाठली आहे. सध्या सोशल मीडियावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्या ट्विटची चर्चा आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केला आणि त्याला पेहचान कौन असं शीर्षक दिलं. तर आज नितेश राणेंनी देखील मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. आणि ही प्रजाती फक्त भंगारात आढळते असा मजकूर त्याला जोडलाय. अशा पद्धतीनं एकमेकांवर टीका करताना नेते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विसरलेत का असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातोय.
ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..
— nitesh rane (@NiteshNRane) December 25, 2021
ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/eoZzy7smAR
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधिमंडळात दाखल झाले तेव्हा तिथल्या पायऱ्यांवर आंदोलन करणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी 'म्याव-म्याव' असा मांजराचा आवाज काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या या कृतीवर नितेश राणे खूश होऊन हसले, पण आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांच्याकडे वळून पाहिलं नाही.
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
नितेश राणे यांच्याकडून वेळोवेळी होणाऱ्या वैयक्तिक टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा आदित्य यांचा प्रयत्न असतो. पण ठाकरे आणि राणे यांच्यामधला राजकीय संघर्ष पुढच्या पिढीमध्ये आणखी खालच्या पातळीवर जाणार का? तसंच विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच्या नितेश राणे यांच्या या कृतीला भाजपचं समर्थन मिळत राहणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत नागरिकांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :























