एक्स्प्लोर
आज कृषि दिन...! महाराष्ट्रात 1 जुलैला का साजरा केला जातो हा दिवस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन (1 जुलै) 'कृषी दिन' (Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.
![आज कृषि दिन...! महाराष्ट्रात 1 जुलैला का साजरा केला जातो हा दिवस maharashtra kisan farmer krishi din 2020, vasantrao naik birth anniversary आज कृषि दिन...! महाराष्ट्रात 1 जुलैला का साजरा केला जातो हा दिवस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/01154910/WhatsApp-Image-2020-07-01-at-10.06.45-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी 1965 मध्ये सांगितले होते.
वसंतराव नाईक यांच्या कृषीक्षेत्रातील योगदानाचा सन्मान
वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. 'संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे' हा विचार त्यांनीच दिला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो.
'शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होणार', बोगस बियाणांच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल
कृषिदिनाचा घोळ
वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. मात्र फडणवीस सरकार सत्तेत असताना त्यांनी एक जुलै हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यावर राज्यभरातून राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर शासनाने पुन्हा एक जुलैला कृषिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. कृषिदिन केवळ शासकीय कार्यालयात साजरा होण्यापर्यंत मर्यादित न राहता, तो शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा व्हावा, अशी भूमिका घेण्यात आली.
अन्नदात्याला सलाम करतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
परवाच्या आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कृषि दिन साजरा करण्याबाबत सांगितलं आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले होते की, एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असं ठाकरे यांनी म्हटलं होतं. शेतकरी दिन,जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्यांना, अन्नदात्याला सलाम करतो, धन्यवाद देतो, असं त्यांनी म्हटलं होते.
‘कृषीक्रांती’ घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या दूरदृष्टी, व कर्तृत्वामुळे सदैव स्मरणात राहतील, त्यांचे विचार, कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करुन अभिवादन केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)