Davos : दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक आकर्षित करणार
World Economic Forum : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या दावोस परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने पॅवेलियन उभं केलं आहे.
![Davos : दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक आकर्षित करणार Maharashtra Inaugurates it Pavillion at WEF Davos summit makes a pledge towards sustainable development for a trillion dollar economy Davos : दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक आकर्षित करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/352701a16639bf06e52e2421c1506874_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
दावोस: जगाचं लक्ष लागून असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आलं आहे. दावोस परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी भारतामधून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं एक प्रातिनिधीक मंडळ गेलं आहे. त्यांच्याकडून या पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आसं आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी जगभरातून गुंतवणूक आकर्षित करणे यासाठी प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्र सरकारकडून दावोसमध्ये गेलेल्या प्रातिनिधीक मंडळामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उर्जा मंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक आशिष कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जगभरातून राज्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.
मंत्री @Subhash_Desai जी @NitinRaut_INC जी यांच्यासह आज @Davos येथे महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. @wef मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व जागतिक व्यासपीठावर वाढवणे मजबूत महाराष्ट्रासाठीच नव्हे तर बलशाली भारतासाठी आवश्यक आहे pic.twitter.com/kyivUH4dFz
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 22, 2022
महाराष्ट्राचे अस्तित्व जागतिक व्यासपीठावर वाढवणे मजबूत महाराष्ट्रासाठीच नव्हे तर बलशाली भारतासाठी आवश्यक आहे असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
प्लास्टिक पुनर्वापर क्षेत्रातील जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या बेल्जियमच्या जेमिनी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेंद्र पटावरी जी यांची महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं या कंपनीसोबत करार करण्यात याला. तसेच प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासंबंधी यूएईसोबतही एक करार करण्यात आला आहे. यावेळी प्लॅस्टिकचा पुनर्वापर व प्लास्टिक उत्पादकांच्या जबाबदारीविषयी विस्तृत चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र राज्याने ग्लोबल प्लॅस्टिक अॅक्शन पार्टनरशीप यांच्यासोबत करार केला आहे. त्यामुळे राज्याच्या भविष्यातील शाश्वत विकासाचा रोडमॅप तयार होण्यास मदत होईल. 2018 साली राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. असं करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)