(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 4th May : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्या मनात नाही, आत्मचरित्रात पवारांची भूमिका, प्रतिक्रिया देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार
शरद पवारांचे (Sharad Pawar) आत्मचरित्र "लोक माझे सांगाती"मध्ये ठाकरे गटाची कोंडी करणारा आणखी एक मजकूर आहे.. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असं पवारांनी पान क्रमांक 417 वर लिहिलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप स्वतः ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं करत असतात. वाचा सविस्तर
'जय भवानी, जय शिवाजी' म्हणा आणि मतदान करा, उद्धव ठाकरेंचे आवाहन
मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे पतंप्रधान मोदींनी जाहीर सभेत सांगितले. धार्मिक आवाहन केले म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता पण कदाचित आता नियम बदलले असतील. देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर कर्नाटकातील मराठी जनतेने देखील मतदान करताना 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणा आणि मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhhv Thackeray) पत्रकार परिषदेत केले आहे. वाचा सविस्तर
सांगली जिल्ह्यातील विटा-सातारा रोडवर कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, कारमधील पाच पैकी चार जणांचा जागीच मृत्यू
विटा सातारा रोडवर नेवरी गावाजवळ आज (4 मे) सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एकाच कारमधील पाचपैकी चौघांचा समावेश आहे. यामध्ये 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अपघातात एकजण जखमी असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्वजण तासगाव तालुक्यातील गव्हाण गावचे आहेत. ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर गाडीत असलेल्या एअर बॅग उघडल्याने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाचा सविस्तर
अजितदादा घोटाळेबाज, कधीही अटक होऊ शकते; शालिनीताई पाटलांची घणाघाती टीका
शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खूप घाईत घेतला, असं मत माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं त्या म्हणाल्या आहेत. तसंच अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यांखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, अशी घणाघाती टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे वाचा सविस्तर
सत्तासंघर्षाच्या निकालासाठी उरले फक्त पाच दिवस, 'या' तारखा सर्वाधिक महत्त्वाच्या
कधी लागणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल?.संपूर्ण महाराष्ट्राला सध्या हा प्रश्न पडलेला आहे. पण आता ही प्रतीक्षा जवळपास संपत आली आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. 8 ते 12 मे या काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर