Maharashtra Headlines 30th May : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
धानोरकर कुटुंबावर मोठा आघात, तीन दिवसात पिता-पुत्राचं निधन
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं आज (30 मे) निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान धानोरकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तीनच दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं. अवघ्या तीन दिवसात पिता पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वाचा सविस्तर
अराजकीय गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थवर गेलो होतो, राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थवर सोमवारी (29 मे) डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. त्यांची ही भेट तब्बल सव्वा तासांची होती. ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे चर्चांना देखील उधाण आलं आहे. मात्र "अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर गेलो होतो," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे राजकीय नेते भेटले आणि राजकारणावर चर्चा झालीच नाही, यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे. वाचा सविस्तर
भंडारदऱ्यात पर्यटन संचालनालयाकडून जूनमध्ये काजवा महोत्सवाचे आयोजन, पर्यावरण प्रेमींचा विरोध
महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन संचालनालयाकडून भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात दरवर्षी काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील 3 आणि 4 जून रोजी हा रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र काजवा महोत्सवावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 5 जून दरम्यान लागण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोडबाबत ग्रामपंचायतीचा ठराव, मंदिर प्रशासनाकडे अंतिम निर्णय
गेल्या काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना ड्रेस कोड परिधान करावा, अशी नियमावली लागू करण्यात आली आहे. नाशिकजवळील सप्तशृंगी देवी मंदिरात देखील याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सद्यस्थितीत वणी ग्रामपंचायतीकडून ड्रेसकोड लागू करण्याबाबत ठराव करण्यात आला असून हा ठराव मंदिर संस्थानकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर ड्रेस कोडबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर