एक्स्प्लोर

Balu Dhanorkar : ज्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार, त्याच दिवशी रुग्णालयात, बाप-लेकाचा तीन दिवसात मृत्यू; धानोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला!

Balu Dhanorkar News : तीनच दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं. अवघ्या तीन दिवसात पिता पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Balu Dhanorkar News : चंद्रपूरचे (Chandrapur) काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आज (30 मे) निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान धानोरकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तीनच दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं. अवघ्या तीन दिवसात पिता पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

आधी पित्याचं निधन

बाळू धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचं शनिवारी 28 मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नागपूर इथे दीर्घ आजाराने निधन झालं होतं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुलगी अनिता बोबडे, सून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पत्नी वत्सला धानोरकर, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार होता. नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. त्यानंतर भद्रावती इथल्या घुटकाळा वॉर्डातील निवासस्थानी 27 मे रात्री आठ ते 28 मे सकाळी आठ वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी 28 मे रोजी सकाळी 9 वाजता भद्रावती इथल्या जैन मंदिर स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मग पुत्राचा अखेरचा श्वास

परंतु ज्या दिवशी नारायण धानोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच दिवशी म्हणजे 28 मे रोजी बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरातील अरिहंत या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु प्रकृती खालावल्याने आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या (31 मे) संध्याकाळी 5 वाजता वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात धानोरकर कुटुंबाने पिता पुत्राला गमावलं. 

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते. 

संबंधित बातमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget