![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Headlines 30th April : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील : अमित ठाकरे
"तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के काम होतात, कधी कामं होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील," असं वक्तव्य मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा आज मुंबईत पार पडला. यावेळी अमित ठाकरे यांनी लवकरच सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला. वाचा सविस्तर
कार्यकर्त्याची मर्जी राखण्यासाठी अजित पवार थेट झेरॉक्स दुकानात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे आज एक वेगळे आणि खूपच खास रूप पहायला मिळाले. बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छाही पूर्ण केली. वाचा सविस्तर
कांद्याच्या दरात घसरण, नाशिकच्या शेतकऱ्याने केला कांद्याचा अंत्यविधी
राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहे. नाशिक जिल्ह्याला देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका फटका बसला आहे. कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे कांदा सडू लागल्यानं त्याला बाजारात कवडीमोलाचा दर मिळतोय. त्यामुळं नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा अंत्यविधी केला आहे. योगेश सोनवणे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. वाचा सविस्तर
सध्याची कोरोना लाट 15 मेपर्यंत संपणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दावा
कोरोनाची लाट ओसरत असून 15 मे पर्यंत लाट संपुष्टात येणार असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. राज्यात कालपर्यंत अकराशे कोरोनाचे रुग्ण होते. हा आकडा आत्ता 460 च्या जवळ आला आहे. तरीही नागरिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन सावंत यांनी केलं आहे. hp1v6 ही कोरोनाचा ची लाट ओसरत असून टास्क फोर्सच्या माहितीनुसार ही लाट 15 तारखेपर्यंत संपुष्टात येतील असा दावा तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केला आहे. वाचा सविस्तर
पैठण बाजार समिती मंत्री भुमरेंच्या ताब्यात, संपूर्ण 18 जागांवर विजय
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण बाजार समितीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास आघाडीला 18 पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही. त्यामुळे पैठण तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी कायम ठेवला आहे. तर विरोधकांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. वाचा सविस्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)