Coronavirus: सध्याची कोरोना लाट 15 मेपर्यंत संपणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दावा
Coronavirus: राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
मुंबई : कोरोनाची लाट (Coronavirus) ओसरत असून 15 मे पर्यंत लाट संपुष्टात येणार असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. राज्यात कालपर्यंत अकराशे कोरोनाचे रुग्ण होते. हा आकडा आत्ता 460 च्या जवळ आला आहे. तरीही नागरिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं आहे.
hp1v6 ही कोरोनाचा ची लाट ओसरत असून टास्क फोर्सच्या माहितीनुसार ही लाट 15 तारखेपर्यंत संपुष्टात येतील असा दावा तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केला आहे. लाट जरी संपुष्टात येत असली तरी नागरिकांनी कोरोना पासून खबरदारी घेण्याचे आव्हान ही डॉक्टर तानाजी सावंत यांनी केले आहे. सध्याच्या कोरोनाचा लाटेचा धोका कमी तरी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
राज्यात या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट
राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. 20 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यात 5 हजार 233 कोरोना रुग्ण आढळले होते. 13 ते 19 एप्रिल दरम्यान ही संख्या 6 हजार 102 तर 6 ते 12 एप्रिल दरम्यान 5 हजार 421 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना नाकावाटे देणार इन्कोव्हॅक लस
मुंबई महनगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर भारत बायोटेकची इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध असणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. 24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. नोंदणी जागेवरच होईल आणि लसीकरण केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असं म्हटलं जाते.
कुठे घेता येणार लस?
ही लस 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना घेण्यात येणार आहे. कोरोनाचे दोन डोस झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घेता येणार आहे. दुसऱ्या डोसला सहा महिने पूर्ण झाल्यनंतरच ही लस घेता येणार आहे. कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन या पैकी कोणत्याही लसीचे दोन डोस पूर्ण झाले असतील तर लस घेता येणार आहे. या लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही लस केंद्रावरच मिळणार आहे.
संबंधित बातम्या :