(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 10th June : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.(वाचा सविस्तर)
अजित पवारांना डावललं?
अखेर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवलीच. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करत असल्याची घोषणा केली. अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मात्र अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. (वाचा सविस्तर)
मोठी बातमी! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा; येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार
पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. (वाचा सविस्तर)
कोकण रेल्वेवरील गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार, कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार आहे. कारण आजपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग 40 किलोमीटर प्रतितास असेल. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)
तरुणांच्या किरकोळ वादातून दगडफेक, अमळनेर शहरात दोन दिवस संचारबंदी लागू
सध्या राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण असून आज वादग्रस्त प्रकरणामुळे धुळे (Dhule) शहरात देखील मोर्चा काढण्यात आला होता. अशातच अमळनेर शहरातील (Amalner) जिंजर गल्लीत काल रात्री दोन गटात हाणामारी होत दगडफेक झाली. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेरात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)