एक्स्प्लोर

महापालिकेतील स्थायी समितींच्या अधिकारांना कात्री?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर 26 महापालिकांना हा निर्णय लागू होणार आहे.

मुंबई : राज्यातील महापालिकांमध्ये 25 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रस्तावास (contract) स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक असते. मात्र, शासन वेळोवेळी अधिसूचित करेल अशा रकमेपेक्षा अधिक खर्च असणाऱ्या प्रस्तावालाच आता स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर 26 महापालिकांना हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे बीएमसी वगळता इतर महापालिकेच्या स्थायी समितींचे अधिकार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. स्थावर मालमत्ता किंवा त्यासंदर्भातील संविदा (प्रस्ताव) वगळून पंचवीस ते पन्नास लाखाच्या मर्यादेत खर्च असणाऱ्या संविदा (प्रस्ताव) महापौरांनी पूर्व मान्यता दिल्याशिवाय आयुक्तांना करता येत नाहीत. महापौरांनी वर्षभरात मान्यता दिलेल्या संविदांची एकूण किंमत अडीच कोटींपेक्षा अधिक असत नाही. तसेच पंचवीस लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या संविदेस स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक असते. या प्रकारची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 मधील कलम 73 च्या खंड (क) मध्ये करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार अ ते ड या गटांतील प्रत्येक महापालिकेसाठी 25 लाख ही एकच वित्तीय मर्यादा 2011 मध्ये निश्चित करण्यात आली आहे. बदललेल्या परिस्थितीत प्रत्येक महानगरपालिकेसाठी त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार स्वतंत्र मर्यादा असण्यासह वित्तीय मर्यादेत वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील विधेयक विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र कायदा असल्याने त्याला ही सुधारणा लागू असणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget