एक्स्प्लोर
कुणाचंच ठरेना, आता अभिजित बिचुकले सत्तास्थापनेचा दावा करणार
येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. बिचकुले यांनी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. बिचुकले यांच्या आधी बीडच्या एका युवकाने देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझ्याकडे पदभार द्या, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 16 दिवस झाले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेनेच्या महायुतीतील तिढ्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होऊ झालेला नाही. दरम्यान बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी राज्यातील सर्व आमदारांना एक पत्र लिहिले आहे. बिचुकले यांनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकलेंनी या पत्रात म्हणाले आहेत. यासोबतच जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा आणि मंत्रिमंडळामध्ये योग्य मंत्रिपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे. अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. बिचकुले यांनी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. बिचुकले यांच्या आधी बीडच्या एका युवकाने देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझ्याकडे पदभार द्या, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. आमदारांना लिहिलेल्या पत्रात बिचुकले म्हणतात... 'मी स्वत: गेली 20 वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणांस माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन 2004, 2009, 2014 आणि 2019 अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी देखील मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2019 साठी मी 182 वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरु, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत;चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे हे तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे', असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. मात्र महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं कौतुक केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते तर त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज अशीच भूमिका मांडल्यानं महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. मात्र महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं कौतुक केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते तर त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज अशीच भूमिका मांडल्यानं महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. आणखी वाचा























