एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आर्थिक पाहणी अहवाल : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका, स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट

Maharashtra Economic Survey Report : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. राज्याच्या स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट झाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्याचे दरडोई उत्त्पन्न कमी झाले असून कृषी क्षेत्र सोडल्यास सर्वच क्षेत्राला फटका बसल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

राज्य अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ अपेक्षित 2020-21 च्या पूर्वअनुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ अपेक्षित आहे. यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहेत तर उद्योगात उणे 11.3 टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे 9 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर वने आणि लाकूड तोडणी 5.7 % वाढ अपेक्षित असून मत्स्यव्यवसाय आणि मस्त्य शेतीमध्ये 2.6% वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण उणे 11.8%, बांधकाम उणे 14.6% वाढ अपेक्षित आहे. त्याचा परिमाण उद्योग क्षेत्रात उणे 11.3% वाढ अपेक्षित आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

वार्षिक कर्ज योजनेअंतर्गत 2020-21 मध्ये कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रासाठी वार्षिक लक्ष्य 93 हजार 626 कोटी होतं. 2020-21 मध्ये डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे 40 हजार 515 कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले. 2019-20 मध्ये ते 28 हजार 604 कोटी इतकं होतं. 2020-21 मध्ये सप्टेंबर अखेर 30 हजार 14 कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप करण्यात आले तर 2019-20 मध्ये हे कर्ज 34 हजार 427 कोटी होतं.

जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले. पीडित शेतकऱ्यांना कमाल 2 हेक्टर क्षेत्रातीतील शेतपिकांसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये फळ पिकांसाठी 25 हजार प्रति हेक्टर या दराने दोन हफ्त्यात चार हजार 374.43 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात 1,56,925 कोटी घट अपेक्षित 

पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2019-20 चे सांकेतिक स्थूल उत्पन्न 28,18,555 कोटी इतके होते. तर 2018 -19 मध्ये 2519628 कोटी होते. 2019-20 मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न 2134065 कोटी होते तर 2018-19 मध्ये 2033314 कोटी होते. सन 2019-20 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,02,130 कोटी होते तर 2018-19 मध्ये 1,87,018 कोटी होते. वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 च्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात 1,56,925 कोटी घट अपेक्षित आहे. 2020-21 चे दरडोई उत्पन्न 1,88,784 अपेक्षित आहे. 2020-21 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा 3,47,457 कोटी तर 2019-20 सुधारित अंदाजानुसार 3,09,881 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजनानुसार महसुली जमा 3,47,457 कोटी तर 2019-20 सुधारित अंदाजानुसार 3,09,881 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaVikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुतेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Embed widget