एक्स्प्लोर

Maharashtra Strike : आरोग्य कर्मचारी, परिचारिकांचा संपात सहभाग; राज्यभरात रुग्णांचे हाल

Maharashtra Strike Health Sector :  राज्यभरात सुरू असलेल्या संपात आरोग्य कर्मचारी आणि परिचारिका संपात उतरल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.

Maharashtra Strike Health Sector :  जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. राज्यातील आरोग्य कर्मचारी, परिचारिकादेखील या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटेलिटरवर असल्याचे चित्र आहे. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात  आल्या आहेत. तर, रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालयाचे कामकाज होत नसल्याचे चित्र आहे. 

राज्यात सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. या संपामुळे सर्वच कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहेत. त्यातल्या त्यात आरोग्य सुविधांना याचा मोठा फटका बसतोय. रुग्णालयात डॉक्टरांव्यतिरिक्त इतर कर्मचारी मग ते आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी नसल्याने नियमित कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी तर ग्रामीण रुग्णालय ओस पडली असल्याचे चित्र आहे. 

बीड जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोजचे रेग्युलर चेकअप आणि तात्पुरत्या छोट्या शस्त्रक्रिया नर्सिंग स्टाफ नसल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. आपात्कालीन सेवा सुरू असल्या तरी रुटीन रुग्णांना मात्र या संपाचा फटका बसत आहे. 

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरीक जिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या कंत्राटी कर्मचारी काम करत असून सध्या तरी तिथे रुग्णांना सुविधा मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच कोणतेही अत्यावश्यक सुविधांना अडचणी निर्माण होत नाही. इथल्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, सरकारने जर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील ग्रामीण (उप जिल्हा) रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र 22 पैकी 16 कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही.  तर काही रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात आल्यावर आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले गेले असल्याचे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले गेले अशी नाराजी व्यक्त केली. अनेकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. काही रुग्णांना तातडीने उपचाराची गरज असताना (कुत्रा चावलेला असताना) रुग्णालयात त्यांच्याकडे पाहायला ही कोणी नव्हते असे चित्र हिंगणा ग्रामीण रुग्णालयात दिसून आले.

वर्धामध्ये या संपात आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट उप जिल्हा रुग्णालयातील 60 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कर्मचारी संपावर गेल्याने येथे असलेल्या ऑर्थोपेडिक आणि गायनॅक विभागातील शस्त्रक्रिया रखडल्या आहे. गेल्या दोन दिवसात चार शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे. इतर जिल्ह्यातून आलेले रुग्ण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. गायनॅक विभागात सीझर व्यवस्था कोलमडली आहे. सीझरसाठी येणाऱ्यांना इतर रुग्णलयात दाखल करण्यात येत आहे. 

गोंदिया जिल्ह्यात एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यातच काही दिवसापासून वातावरण मध्ये बदल झाल्याने रुग्णालयात रुग्णाची संख्या देखील वाढली आहे. अशातच या रुग्णालयातील जवळपास 600 परिचारिका-कर्मचारी हे संपावर गेले आहेत.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयातील 95 टक्के परिचारिका, आरोग्य कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी नर्सिंग महाविद्यालयातील शिकाऊ परिचारिकांची मदत घेतली जात आहे. या संपामुळे ठराविक ऑपरेशन सध्या बंद करण्यात आले आहे.

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची हाल होत आहेत. आरोग्य कर्मचारी, वॉर्ड बॉय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः  व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ढकलून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. तर मनुष्यबळच्या अभावामुळे अनेक शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget