सध्यातरी दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेवर आणि ऑफलाईन होणार, विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये : शिक्षणमंत्री
Maharashtra Exam : 15 फेब्रुवारीपर्यंत बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयासंदर्भात वेट ॲंड वॉचची भूमिका घेतली असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Exam : 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयासंदर्भात वेट ॲंड वॉचची भूमिका असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भावात घट झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. काही भागांतील शाळा सुरु आहेत, तर काही भागांतील शाळा अद्याप बंदच आहेत. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की, परीक्षा पुढे ढकलण्यात येणार? यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षांबाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतोय. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात. त्यामुळे विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही बोर्ड, एसइआरटीशी चर्चा करत आहोत. विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर पुढेच निर्णय अवलंबून आहेत."
"शिक्षणात क्लासरूमचा फिल येत नाही. तोपर्यंत इनटरअॅक्टिव्ह सेशन येत नाही, तरी मिस होत असतं. अकरावीचे अॅडमिशन ऑनलाईन व्हावं अशा आमच्या अपेक्षा आहेत. पुढचं वर्ष विद्यार्थ्यांचं वेळेत सुरु व्हायला हवं, हिच अपेक्षा. पंधरा तारखेपर्यंत आढावा घेऊन भूमिका ठरवू. तसेच, शिक्षक संघटना, शिक्षणतज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवू.", असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतिलं आहे. तसेच सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि ऑफलाईन परीक्षा होतील, अशी शक्यता असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. मात्र ठराविक शहरं सोडली तर जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु न करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, नंदुरबारमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. तर काही जिल्ह्यांत अद्याप शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसून सर्वस्वी निर्णय पालकवर्गावर अवलंबून असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :