Maharashtra Dam Water Storage: महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा, कोणत्या विभागात किती भरली धरणे? कुठे विसर्ग सुरु?
राज्यात सध्या ठिकठिकाणी पाऊस सुरु असला तरी महाराष्ट्रातील काही विभागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती पाणीसाठा उरलाय? जाणून घ्या..
Maharashtra Dam Water Storage: राज्यात सध्या ठिकठिकाणी पाऊस होत असून धरणांमधील पाणीपातळी वाढत आहे. काही (dam water) धरणांमधून विसर्ग करण्यात येत असून अनेक धरणांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येतंय. दरम्यान, राज्यातील कोणत्या धरणांत किती पाणीसाठा उरलाय?
जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, राज्यातील एकूण धरणांमध्ये आता 36.07 टक्के उपयुक्त धरणसाठा आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ १५.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वात कमी धरणसाठा आहे.
कोकण विभागात दमदार पावसाने धरणसाठा वाढतोय
कोकणात सुरु असलेले मुसळधार पावसाने भातसा धरणासह सुर्या धामणी व अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून कोकणातील धरणे आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत.
भातसा- 54.42%
सूर्या धामणी- 50.68
अप्पर वैतरणा- 37.50
मराठवाड्याला पाण्याची प्रतीक्षाच
मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होत असल्याने धरणांमध्ये हळुहळु पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जायकवाडीचा पाणीसाठा अजूनही ५ टक्क्यांच्या वर न गेल्याने मराठवाड्यातील हजारो गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
जायकवाडी- 4.13
निम्न दुधना- 6.27
पूर्णा येलदरी- 30.09
माजलगाव - ०
मांजरा- ०
ऊर्ध्व पैनगंगा- 39.55
तेरणा- 23.45
नाशिक विभागात काय स्थिती?
नाशिक विभागात सध्या २७.८६ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी हा पाणीसाठा ३९.१० टक्के एवढा होता. नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असून सर्वाधिक धरणे असणाऱ्या या विभागातील धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दारणा- 49.95
गंगापूर- 33.67
भंडारदरा- 44.90
मूळा- 21.69
गिरणा- 61.48
हतनूर- 33.80
वाघुर- 63.28
पुणे विभागातील धरणे किती भरली?
पुण्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली असून बहुतांश धरणांमधला पाणीसाठा आता वाढत आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील प्रमुख धरणेही आता ५० टक्क्यांच्या वर पोहोचली असून वारणा ६०.५३, राधानगरी ७०.५९ तर कोयना ४५.५८ टक्क्यांवर आहे.
डिंभे- 24.49
पानशेत- 51.37
खडकवासला- 70.24
पवना 39.27
चाकसमान- 25.79
नीरा देवघर 34.12
नागपूर, अमरावती विभागांमध्ये काय परिस्थिती?
विदर्भात यंदा मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणसाठा वेगाने वाढत असून बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून येतंय. अमरावती विभागात ऊर्ध्व वर्धा धरण ४७ टक्के तर बेंबळा ४५ टक्के भरले आहे. काटेपूर्णा ३०.५७ तर खडकपूर्णा शुन्यावर आहे.
निम्न वर्धा- 53.95
गोसीखुर्द- 30.03
पेंच तोतलाडोह- 59.39
गोंदियातील पुजारीटोला धरणाचा पाण्याचा विसर्ग वाढला, 8 दरवाजे उघडले
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला हा धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा धरण असुन तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणाचे ०८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून ६०४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे.
हेही वाचा: