Maharashtra Corona lockdown LIVE Updates: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबतचे मह्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Covid 19 Cases LIVE Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचे अहोरात्र प्रयत्न
LIVE
![Maharashtra Corona lockdown LIVE Updates: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबतचे मह्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर Maharashtra Corona lockdown LIVE Updates: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबतचे मह्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/25/afa6c2a5551b3503e919a018b4f313f7_original.jpg)
Background
राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचं लक्ष्य
मुंबईत कोरोनाबाधितांबाबतचं काहीसं दिलासादायक चित्र असतानाच राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. पण, त्यातही कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा लक्ष देण्याजोगा ठरत आहे. शनिवारी राज्यात 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.
मुंबईतून दिलासादायक बातमी
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या धर्तीवर राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले. असं असतानाच कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या सर्व प्रयत्नांना आता काही अंशी यश येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत शनिवारी पालिकेनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार 24 तासांत 5888 नवे कोरोनाबाधित आढळले. मागील तीन आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तर, सलग चौथ्या दिवशी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याची बाबही यातून स्पष्ट होत आहे.
कोरोनाची एकंदर आकडेवारी पाहता राष्ट्रीय स्तरावरही रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. पण, याचवेळी देशामध्ये सुरु असणारी लसीकरण मोहिम आणि त्याला मिळालेला वेग कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यास कितपत फायद्याचा ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केेंद्रे सुरू राहणार, मुंबई महापालिकेला आज दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा
उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केेंद्रे सुरू राहणार, आज दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा मुंबई महापालिकेला झाला, कोव्हॅक्सिन लशीचा साठा मर्यादित असल्यानं ज्यांचा दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा असणार त्यांनाच ती दिली जाणार, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती, आज लशींचा तुटवडा असल्यानं 132 पैकी केवळ 37 लसीकरण केंद्रे मुंबईत सुरू होती
मुंबईला ऑक्सिजन तुटवड्याचा हायअलर्ट
मुंबई : मुंबईला ऑक्सिजन तुटवड्याचा हायअलर्ट; तळोजा येथील लिंडे कंपनीच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये काल रात्री तांत्रिक बिघाड झाला असल्याची महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती
पालघर जिल्ह्यात लसीकरण सुरळीत; परंतु, चार ते पाच दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध
पालघर जिल्ह्यातील लसीकरणाचे अपडेट्स :
- एकूण लसीकरण केंद्र : 86
- सुरु असलेली केंद्र : 71
बंद असलेली केंद्र : 15 - सुरु लसीकरण केंद्रांपैकी शासकीय : 58, खाजगी :13
गेल्या दोन दिवसापासून लसीकरण ठप्प असून शनिवारी पालघर जिल्ह्यासाठी 30000 लसींचा साठा प्राप्त झाला आहे. सोमवारपासून 71 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरळीत झालं आहे. सध्या चार ते पाच दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे.
मुंबईतील 132 पैकी केवळ 37 वॅक्सिनेशन सेंटर्स सुरू
प्रमुख मोठे बीकेसी आणि नेस्कोमधील वॅक्सिनेशन बंद आहे..थोड्या बहुत फरकानं राज्यात सगळीच कडे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.. राज्यात 1 मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरणाला सुरूवात करायची आहे..मात्र दुसऱ्या टप्प्यातील लोकांचंच संपूर्ण लसीकरण लसींच्या कमी पुरवठ्यामुळे थांबलं असताना १ मे पासून राज्यात लसीकरणाची काय अवस्था असणार हाच प्रश्न पडत आहे.
हवेत उपलब्ध असलेले ऑक्सिजन वैद्यकीय गरजेसाठी कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध करून देणारा नागपूर महापालिकेचा प्लांट उद्या कार्यान्वित होणार
हवेत उपलब्ध असलेले ऑक्सिजन वैद्यकीय गरजेसाठी कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध करून देणारा नागपूर महापालिकेचा प्लांट उद्या कार्यान्वित होणार. मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयानंतर मनपाच्याच आणखी २ रुग्णालयात असे प्लान्ट लवकरच उभारणार. ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे मनपाचे पाऊल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)