एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Coronavirus Vaccination : लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

Maharashtra Coronavirus Vaccination : देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे 1 कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

Maharashtra Coronavirus Vaccination : देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे 1 कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 412 जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप  व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

14 एप्रिलपर्यंत देशभरात 'लस उत्सव'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर आज (रविवार)पासून 14 एप्रिलपर्यंत देशभरात 'लस उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. 'लस उत्सव' या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे. 

देशात 85 दिवसांत दिल्या गेल्या 10 कोटी लसी 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार भारतात मागील 85 दिवसांमध्ये 10 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. यामुळं जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा पहिलाच देश ठरत आहे. चीनला 10 कोटी लसी देण्यासाठी 102 दिवसांचा कालावधी लागला होता. 

लस वाया जाऊ देऊ नका, पंतप्रधानांचं आवाहन 

लस कोणत्याही प्रकारे वाया जाऊ दिली जाणार नाही, यावर आपण लक्ष दिलं पाहिजे यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही दिसले, 'अनेकदा यामुळं परिस्थिती आणि प्रसंग बदलण्यास मदत होते. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. आपण लस उत्सवाचं आयोजन करु शकतोय का? तशी वातावरणनिर्मिती करु शकतोय का? एका खास मोहिमेअंतर्गत आपण अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही लस पोहोचवली पाहिजे. लस कशा पद्धतीनं वाया जाणार नाही, यावर लक्ष दिलं पाहिजे. 'लस उत्सव' दरम्यानच्या चार दिवसांत लस वाया गेली नाही, तर आपली लसीकरण क्षमताही वाढलेली असेल.'

दरम्यान, एकीकडे लस उत्सवाची हाक पंतप्रधानांनी दिलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच लसींच्या पुरवठ्यावरुन आता वेगळंच राजकारणही तापू लागलं आहे. त्यामुळं राजकारण बाजूला सारत नेतेमंडळी, सत्ताधारी आणि विरोधकांनी नागरिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचाच सूर जनसामान्यांतून आळवला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळालाkonkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, सरकरार स्थापन होण्यापूर्वीच मागणीSanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्नRamdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget