Maharashtra Coronavirus Crisis: राज्यात 24 तासांत आढळले 60,212 रुग्ण, 281रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 60,212 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 31, 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने मंगळवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. राज्यात 24 तासांत पहिल्यांदाच तब्बल 60,212 रुग्ण आढळून आले असून, 281रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.
राज्यात आज 60,212 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 31, 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,86,6097 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5, 93, 042 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात 281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,852 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.44% झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 10, 112 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तब्बल 99 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस संचारबंदी
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
