Maharashtra Corona Crisis : राज्यातील जेल कोरोनाच्या विळख्यात, आतापर्यंत 197 कैद्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील कारागृहांची एकूण संख्या 46 आहे. त्यांची एकूण क्षमता 23 हजार 217 इतकी आहे. मात्र या सर्व कारागृहांत सध्या 34 हजार 422 कैदी शिक्षा भोगत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दररोज नवीन धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान राज्यातील कारागृह देखील कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. कारागृहांमधील कोरोनाची आकडेवारीही तुरूंग प्रशासनाला चिंतीत करणारी आहे. 19 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कारागृहात 197 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यापैकी 7 कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
कैद्यांसोबत त्यांच्या नजर ठेवणारे कर्मचारी सुरक्षित नाहीत. आकडेवारीनुसर अनेक कारागृह कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत 94 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा लागण झाली आहे. यापेकी 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे.
Rahul Gandhi Corona Positive: राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीट करुन दिली माहिती
एका कारागृह अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकूण 46 कारागृह आहेत, ज्यात बरेच कैद आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेक कैद्यांची सुटका करण्यात आली आणि आता दुसर्या कोरोनाच्या लाटेतही जेलमधील कोरोनाची आकडेवारी भयावह आहे आहे.
राज्यातील तुरुगांमधील कोरोना बाधितांची आकडेवारी
पुण्याच्या येरवडा कारागृहात सर्वाधिक 36 कोरोना पॉझिटिव्ह कैदी आहेत. तर 14 तुरूंगातील कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईला लागून असलेल्या कल्याण आधारवाडी कारागृहातील 31 कैदी आणि 1 जेल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोल्हापूर कारागृहात 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मुंबईच्या तुरूंगात सध्या 2 कैदी आणि 4 तुरूंग कर्मचारी कोरोना संक्रमित आहेत. ठाणे कारागृहात 21 कैदी आणि 3 कारागृह कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईच्या तळोजा तुरूंगात 3 जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रातील तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा दुपटीने कैदी आहेत. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या आर्थर रोड कारागृहात 804 कैद्यांची क्षमता आहे मात्र या जेलमध्ये सध्या 2837 कैदी बंद आहेत. ठाणे कारागृहाची क्षमता 1105 आहे मात्र तेथेही सध्या 3758 कैदी आहेत. नवी मुंबईतील तळोजा जेलची क्षमता 2124 आहे, तिथेही 3353 कैदी आहेत. महाराष्ट्रातील कारागृहांची एकूण संख्या 46 आहे. त्यांची एकूण क्षमता 23 हजार 217 इतकी आहे. मात्र या सर्व कारागृहांत सध्या 34 हजार 422 कैदी शिक्षा भोगत आहेत.