Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 525 कोरोनाबाधितांची नोंद, तर नऊ जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाच्या 525 नव्या रुग्णांची भर तर 992 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 525 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 992 रुग्णे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 206 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 206 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 5211 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 582 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज नऊ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 15 हजार 711 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के आहे. सध्या राज्यात 28,878 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 595 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 81 लाख 38 हजार 182 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात 6396 नवे कोरोनाबाधित
देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 396 नवीन रुग्ण आढळले असून 201 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 6 हजार 561 प्रकरणे आणि 142 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची कमी नोंद झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 450 लोक बरे झाले होते, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 69 हजार 897 वर आली आहे.
महत्वाच्या बातम्या