(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मात्र मृतांचा आकडा शंभरी पार
Maharashtra Corona Update : राज्यात आज 103 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 24 हजार 948 नव्या रुग्णांची भर पडली असून 103 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 45 हजार 648 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 110 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 110 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 3040 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1603 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 103 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 103 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 72 लाख 42 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के आहे. सध्या राज्यात 14 लाख 61 हजार 370 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 41 लाख 63 हजार 858 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची सख्या वाढली
मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 312 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 14 हजार 344 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1 हजार 312 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 591 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 4 हजार 990 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून 97 टक्के झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- भारत बायोटेकच्या Intranasal Booster Dose च्या चाचणीला DCGIची मंजुरी
- NeoCov coronavirus: कोरोनाचा नवा व्हेरियंट Neo Cov ने वाढवली चिंता, नेमका काय आहे हा प्रकार? कितपत धोका?
- महाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha