NeoCov coronavirus: कोरोनाचा नवा व्हेरियंट Neo Cov ने वाढवली चिंता, नेमका काय आहे हा प्रकार? कितपत धोका?
NeoCov coronavirus: कोरोनाचा नवा व्हेरियंट Neo Cov आढळल्यामुळे आता ओमायक्रॉनची लाट कायम असताना एक नवं संकट जगासमोर उभं राहिलं आहे.
NeoCov coronavirus: जगभरातील सर्व देशांना मागील दोन वर्षांपासून विळखा घातलेल्या कोरोनाचा धोका कमी होतोय असे वाटत असतानाच एका नव्या व्हेरियंटचा जन्म होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेला ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा धोका कायम असताना आता नवा आणि अधिक धोकादायक निओकोव्ह (Neo Cov) हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान सध्या प्राण्यांमध्ये आढळणारा या व्हेरियंटचा मनुष्यांना कितपत धोका आहे? याबाबतही शोध सुरु आहे.
रशियाच्या स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की, 'NeoCoV या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत चीनी संशोधकांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे अभ्यास केल्यानंतर हा व्हेरियंट सध्या प्राण्यांमध्ये अधिक फैलावत असून माणसांमध्ये याचा वेगवान प्रादुर्भाव अजूनतरी सुरु झालेला नाही.'
याआधी आढळला आहे निओकोव्ह व्हेरियंट
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला हा व्हेरियंट नवा नसून याचा प्रथम शोध 2012 आणि 2015 रोजी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये लागला होता. या विषाणू आधी वटवाघुळांमध्ये आढळला होता, जो आता माणसांमध्येही आढळल्याने जगभराची चिंता वाढली आहे. कोरोना सर्वात आधी आढळलेल्या चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी या निओकोव्ह व्हेरियंटबाबत खास काळजी घेण्याचं आवाहन करत लागण झालेल्या तीन पैकी एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही दिली आहे.
टास्क फोर्स सदस्यांकडून न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी या निओकोव्ह व्हेरियंटबाबत ट्वीट करत न घाबरता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. हा व्हेरियंच नवीन नसून याआधीही याचे रुग्ण आढळले आहेत. तसंच हा व्हायरस वटवाघळांमध्ये अधिक आढळत असून मनुष्यांमध्ये सध्यातरी अधिक आढळत नसल्याने न घाबरता काळजी घ्यावी असं ट्वीट करत म्हटलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- भारत बायोटेकच्या Intranasal Booster Dose च्या चाचणीला DCGIची मंजुरी
- Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला? काय म्हणालं केंद्रीय आरोग्य मंत्रालय : वाचा सविस्तर
- महाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha