Maharashtra Corona Update : रविवारी राज्यात 362 नव्या रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाच्या362 नव्या रुग्णांची भर तर तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 3,709 सक्रिय रुग्ण आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार, रविवारी राज्यात 362 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मागील 24 तासांत राज्यात 688 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 77,17,362 इतकी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे.
राज्यात सध्या 3,709 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात एक हजार 318 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत 519, ठाण्यात 325, अहमदनगरमध्ये 354 आणि नाशिकमध्ये 225 सक्रिय रुग्ण आहेत. सर्वात कमी सक्रिय रुग्ण हिंगोलीमध्ये आहेत. हिंगोलीत फक्त दोन सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे, मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक एक मृत्यू झाला आहे.
राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नाही. आज राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे महानगरपालिकामध्ये आढळले आहेत. पुणे महानगरपालिकामध्ये 83 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 48 नव्या रुग्णीची भर पडली आहे. मुंबईमध्ये 43 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, मुंबई सर्कलमध्ये आज 81 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर नाशिक सर्कलमध्ये 46, पुणे सर्कलमध्ये 158, कोल्हापूर सर्कलमध्ये 16, औरंगाबाद सर्कलमध्ये 14, लातूर सर्कलमध्ये 10, अकोला सर्कलमध्ये 16 आणि नागपूर सर्कलमध्ये 21 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
61 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद –
राज्यात आज 61 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 5726 इतकी झाली आहे. आज आढळलेल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांमध्ये पुणे महानगरपालिकामध्ये 44, पिंपरी चिंचवडमध्ये 8 आणि पुणे ग्रामीणमध्ये 9 रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, आजपर्यंत चार हजार 733 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.