Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 183 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 219 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 183 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 219 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 902 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 183 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 219 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 93, 84, 641 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 902 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 893 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 280 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 155 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
गेल्या 24 तासांत देशात 1225 नवे कोरोनाबाधित
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा कहर अद्याप संपलेला नसला तरी त्याचा प्रादुर्भाव मात्र कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1225 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1594 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात काल दिवसभरात 28 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन एकूण आकडा 15 हजारांहून कमी झाला आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Updates : निर्बंध मुक्तीची 'गुढी'; महाराष्ट्रातले कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले
Maharashtra Mask Free : मास्क वापरण्याची सक्ती नाही, मंत्री Jitendra Awhad यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha