Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 155 कोरोना रुग्णांची नोंद तर 135 कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण वाढले
Maharashtra Corona Update : राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.
![Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 155 कोरोना रुग्णांची नोंद तर 135 कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण वाढले Maharashtra Corona Update patients 135 discharged today 155 new cases in the state today Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 155 कोरोना रुग्णांची नोंद तर 135 कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण वाढले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/d95e790e4266e5de53b1c887e4b6323c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात 155 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 998 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नागी. राज्यात गेल्या 24 तासात 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,28, 891 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,01,88, 145 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 998 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 998 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 609 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 223, ठाण्यात 85 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
गेल्या 24 तासांत 3688 नवे कोरोनाबाधित
देशात कोरोनाचा संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3688 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी दिवसभरात 2755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3377 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 60 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 2755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 803 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 22 हजार 377 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 96 हजार 640 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)