(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा स्थिर; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण
Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 123 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 112 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 911 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 123 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 112 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 20, 815 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 911 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 911 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 274 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 153 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1335 नवे रुग्ण
देशात आज कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1335 नवीन रुग्ण आढळले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1225 रुग्ण नोंदवले गेले आणि 28 जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील सध्याची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 1 हजार 918 लोक बरे झाले होते. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 672 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 181 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 90 हजार 922 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 25 हजार 775 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संंबधित बातम्या :
Coronavirus : भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा 'हा' मोठा दावा, काय म्हणाले जाणून घ्या?