Corona Update : राज्यातील रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासात 1410 नव्या रुग्णांची नोंद तर 18 जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : गेल्या 24 तासात राज्यातील 1,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
राज्यातील मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून तो 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज 23,894 इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7210 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबई (5075), ठाणे (3295) यांचा क्रमांक आहे. नंदुरबार जिल्ह्यात शून्य अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. जळगाव (17), धुळे (5), जालना (55), लातूर (46) परभणी (29), हिंगोली (22), नांदेड (18), अकोला (21), अमरावती (14), वाशिम (04), बुलढाणा (08), नागपूर (82), यवतमाळ (07), वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3), गडचिरोली (6 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
सध्या राज्यात 1,91,401 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 903 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 17, 62 ,963 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,30,714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4356 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1328 दिवसांवर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 561 मृत्यू
- देशात 100 कोटी लसी दिल्या नाहीत, फक्त 23 कोटी दिल्या हे पुराव्यानिशी सिद्ध करु: संजय राऊत
- PM Modi Mann Ki Baat Live : लसीकरण कार्यक्रमाला लाभलेलं यश भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन : पंतप्रधान मोदी
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या





















