(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona LIVE Updates | रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावर शरद पवार यांची नाराजी
Maharashtra Corona cases Updates : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. राज्यातील संचारबंदी आणि कोरोना संसर्गासंबंधित सर्व अपडेट्स एकाच क्लिकवर
LIVE
Background
पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांचे आभार, 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया....
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करुन आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Maharashtra Coronavirus : राज्यात 58924 नवीन रुग्णांचे निदान, तर 52412 रुग्ण बरे होऊन घरी
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. सोमवारी (19 एप्रिल) 58 हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 52 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के झाले आहे.
Oxygen Express : पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमसाठी रवाना, गाडीसाठी स्पेशल ग्रीन कॉरिडॉर!
महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने भारताची पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी (19 एप्रिल) मध्य रेल्वेच्या कळंबोली रेल्वे स्टेशनमधून रवाना झाली. या एक्सप्रेसला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला. सात टँकरसह ही एक्स्प्रेस विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे. अंदाजे 24 तासात ही एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचेल आणि त्यानंतर तिथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल. या एक्सप्रेससाठी राज्य सरकारकडून रेल्वेला टँकर्स पुरवण्यात आलेले असून रेल्वे हे रिकामे टॅंकर घेऊन देशातील विविध शहरांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरवणार आहे.
अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार, तर सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत डोम डिलिव्हरी
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील.
All groceries, vegetable shops, fruit vendors, dairies, bakeries, confectionaries, all type of food shops, shops related to farm produce, pet food shops, shops related to materials for impending rainy season for individuals/orgs to be open only b/w 7 to 11 AM: Maharashtra Govt pic.twitter.com/N14KZl4Rmk
— ANI (@ANI) April 20, 2021
तन्मय फडणवीस हे नक्की कोण..? फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी, राजेश टोपे उत्तर द्या : शालिनी ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी तन्मय फडणवीस यांनी घेतलेल्या लसीमुळे प्रश्न उपस्थित केले आहेत. शालिनी ठाकरे यांनी थेट आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्वीट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्तर द्या..???
— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 20, 2021
तन्मय फडणवीस हे नक्की कोण..? फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी की 45 वर्षावरील व्यक्ती..? मग त्यांना कोरोना लस दिलीच कशी..?#तुमचाखेळहोतोआमचाजीवजातो https://t.co/mUXoOO5tt7
संचारबंदी असतानाही आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पक्ष प्रवेश घेतला
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पक्ष प्रवेश घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये जानवली गावात शिवसेनेने भाजपचे जानवली गावचे सरपंच शिवराम राणे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रवेश करणाऱ्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. राज्यात संचारबंदी असताना देखील मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मात्र पक्ष प्रवेश करुन संचारबंदीचे नियम मोडताना दिसत आहेत. पक्ष प्रवेश केला तो केला त्यात कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवलाच मात्र काहींनी मास्कही काढला. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाच्या आमदारांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे आहे.
रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन शरद पवार यांची नाराजी
ब्रूक फार्मा प्रकरणावरुन शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "ही वेळ राजकारण करण्याची नाही. लोकांना याच्याशी देणं-घेणं नाही. लोकांना इंजेक्शन मिळाले का, उपचार झाले का हे महत्त्वाचे आहे. या विषयावर राजकारण नको," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. गेल्याच आठवड्यात एक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीला बोलवलं होतं यावरुन सरकारविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद रंगला होता.
दिवसाला 70-75 हजारपर्यंत रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होईल : डॉ. राजेंद्र शिंगणे
दिवसाला 70-75 हजारपर्यंत रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसंच 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला पाहिजे अशी माझी भूमिका आहे, असंही ते म्हणाले. राजेंद्र शिंगणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना ते म्हणाले की, "राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत त्यांनी माहिती घेतली. तसंच लसीबाबत देखील चर्चा झाली."