Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 41 जणांचा मृत्यू
Coronavirus Today : राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 997 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 65 हजार 893 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,07,033 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 37 , 47, 431 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 262 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 262 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 217 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2906 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,37,340 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2906 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
देशात 24 तासांत 12 हजार 516 नव्या रुग्णाची भर
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचं पाहायला मिळाली. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात 12 हजार 516 नव्या रुग्णाची भर पडली आहे. गुरुवारी देशात 13 हजार 91 रुग्ण आढळले होते. नव्य रुग्णाच्या संख्येत घट झाली असली तरी मृताची वाढणारी संख्या चिंतेचा विषय आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मृताची संख्या वाढली आहे. गुरुवारी देशात 501 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. बुधवारी देशात 340 जणांचा मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
