Maharashtra Corona Update : राज्यात आज 518 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 97.72 टक्क्यांवर
Coronavirus Cases Today in Maharashtra : राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 518 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 87 हजार 593 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 78 हजार 801 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 893 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 61 , 56, 544 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 168 तासात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत आज 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 250 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 365 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईत आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर सध्या 0.02 टक्के झाला आहे. मुंबईत सध्या 1 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत आज28,440 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 126 लाख 43 हजार 665 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधित
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. अशातच जगाची धास्ती वाढवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारतातही शिरकाव झाला आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आहेत. अशातच देशात काल (रविवार) दिवसभरात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या सध्याची कोरोनाची स्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 98 हजार 416 आहे. तसेच या महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 73 हजार 537 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (रविवारी) 8834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :