Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांची भर, तर 684 कोरोनाबाधितांची नोंद
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 684 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 हजार 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद
राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैक सात रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण वसई विरार येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 9 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 492 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 70 , 63, 688 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 784 नवे कोरोनारुग्ण
जगभरात कोरोना (Corona) कहर सुरूच आहे. मात्र, आता कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5 हजार 784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 252 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) 41 बाधित सापडले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सध्याची स्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 88 हजार 993 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 888 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7 हजार 995 कोरोनाबाधित बरे झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 38 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
इतर बातम्या :