Maharashtra Live Updates: शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील ऑफिसवर पोहचले, पण ऑफिसची झाडाझडती न घेताच परतले
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: मूर्ती संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी फार पूर्वीच पाठवल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर केलेल्या वज्रलेपाला पाच वर्ष होत आल्याने फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी दोन्ही मूर्तींची सखोल तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल त्याच वेळी म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्येच राज्य सरकारकडे पाठविला असून लवकरच त्यांच्याकडून याबाबत मार्गदर्शन मिळेल असेही औसेकर यांनी सांगितले.
रोज हजारोंच्या संख्येने भावी विठ्ठलाच्या पायावर दर्शन घेत असतात. भाविकांच्या या स्पर्शामुळे देवाच्या पायाची सातत्याने झिज होत असते हे वास्तव आहे. यापूर्वी कोरोना काळात मंदिर बंद असताना 2020 मध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेपाची क्रिया केली होती. मात्र सध्या पुन्हा एकदा देवाचे पाय पूर्णपणे झिजल्याचे दिसत असून त्या तुलनेने रुक्मिणी मातेचे पाय मात्र व्यवस्थित आहेत. सातत्याने देवाच्या पायावर होणाऱ्या स्पर्शामुळे ही झीज झपाट्याने होत असल्याने आता झीज कमी होण्यासाठीचे प्रयत्नही मंदिराकडून सुरू करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालास श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत आहेत. मात्र भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत. श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत. भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने मूर्तींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली असल्याचे यावेळी श्री औसेकर यांनी सांगितले.
Mira Bhayandar: पारिजात इमारती मध्ये सकाळी ८ वाजता हा पहिल्या मजल्यावरील घरात शिरला, तिघांवर हल्ला केला, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने बिबट्याला पकडण्यात
भाईंदर येथील तलाव रोड परिसरात आज सकाळी बिबट्याचा वावर दिसला, तेथीलच पारिजात इमारती मध्ये सकाळी ८ वाजता हा पहिल्या मजल्यावरील घरात शिरला आणि घरातील २३ वर्षीय खुशी टाक हिच्यावर हल्ला केला. यात खुशी गंभीर जखमी झाली. मात्र ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी सर्वात आधी मिरा भाईंदर महापालिका चे अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे आले आणि त्यांनी बिबट्याशी लढत देत मुलीला खिडकीच्या बाहेर ठेवलं आणि बिबट्याला रुम मध्ये कोंडून ठेवलं. त्यांच्या या धाडसामुळे बिबट्याला पकडण्यात आलं. आणि त्यांनी आणखीन कुणावर अटॅक केलं नाही.
Nagpur News: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची भाजपपुढे ५० जागेची मागणी; भाजप आपल्या पक्ष श्रेष्ठीसोबत चर्चा करून पुढील दोन दिवसानंतर यावर आपला निर्णय कळवणार
नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भारतीय जनता पक्षापुढे ५० जागेची मागणी केली आहे.
शिवसेनेने आपल्या ५० उमेदवारांची यादी भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांच्याकडे सुपूर्त केली आहे
भाजप आपल्या पक्ष श्रेष्ठीसोबत चर्चा करून पुढील दोन दिवसानंतर यावर आपला निर्णय कळवणार असल्याचे शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.
शिवसेनेच्या ५० जागेची मागणी व राष्ट्रवादीच्या ४० जागेची मागणीचा विचार करता भाजप कडे १५१ पाकी ६१ जागा शिल्लक राहतात.























